वैनगंगेच्या जुन्या पुलाची दुरुस्ती करा !

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीवरील जुन्या पुलाची तात्काळ डागडुजी करण्यात यावी अशी मागणी भंडारा जिल्हा इंटकचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. निवेदना नुसार, मागील जवळपास शंभर वर्षापासुन भंडारा व कारधा या गावाला जोडणारा वैनगंगा नदीवर इंग्रजाच्या माध्यमातुन बांधण्यात आलेला जुना पुल आजही डौलाने उभा आहे. मागील कालावधीत हा पुल जिर्ण अवस्थेत असल्यामुळे प्रशासनाने या पुलावरुनजड वाहतुक बंद केली. परंतु या पुलावरुन ग्रामीण भागीतल नागरीक मोठ्या प्रमाणात पायदळ, सायकल व दुचाकीने ये-जा करीत आहेत. यामुळे या पुलावर बºयापैकी रहदारी दिसुन येते . मात्र या पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असुन पुलावरील बॅरीकेटसुध्दा तुटले आहे त्यामुळे या पुलावर एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

करिता जिल्हा प्रशासणाने याची गंभीरतेने दखल घेऊन वैनगंगानदीवरील जुन्या पुलाची तात्काळ डागडुजी करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.निवेदन देतांना इंटकचे जिल्हा अध्यक्ष धनराज साठवने, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी सांस्कृतिक विभागाचे सरचिटणीस महेंद्र वाहाणे, भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, जिल्हा महासचिव लखन चवरे, इंटकच्या शहर अध्यक्ष स्नेहा भोवते, माजी नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर, उपाध्यक्ष शेख नवाब, शहर महासचिव मेहमुदभाई खान, गोपाल पराते, भावेश नागपुरे, अमरदिप नागपपुरे, रविंद्र येरकडे, दक्षु थोटे इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *