पवन मस्के यांच्या तत्परतेने जिवितहानी टळली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे लाईन परिसरात प्रवाशांच्या अंगावर पडण्याच्या स्थितीत आलेल्या वृक्षांची समाजसेवक पवन मस्के यांच्या पुढाकारातुन काटणी करून प्रवाशांना होणारा संभाव्य धोका टळल्याने प्रवाशी नागरीकांनी पवन मस्के यांचे आभार मानले आहे. भंडारा शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील रेल्वे लाईन लगत असलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ-मोठे झाड असुन त्यापैकीच एक मोठा वृक्ष असल्याने त्या वृक्षांचे फांद्याची वाढ होवुन आजू-बाजूच्या परिसरात पसरलेले होते. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून जिल्हयात संततधार पावसाने थैमान घातले असतांना नदी,नाले व ओढयांना नद्यांचे स्वरूप आले असल्याचे चित्र जिल्हात दिसून येत आहे तर सततच्या पावसाने जिल्ह्यातील कित्येक गावांचे गाव मार्ग बंद झालेले आहे. भंडारा शहरातून जाणाºया नॅशनल हायवे ६ वरील रेल्वे लाईन जवळ असलेल्या एक मोठे वृक्ष पडण्याच्या स्थितीमध्ये आले होते. राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच मोठया प्रमाणात प्रवाशांची रेलचेल राहत असल्याने एखाद्या प्रवाशाच्या अंगावर सदर झाड पडण्याच्या स्थितीमध्ये असतांना सुद्धा तेथून नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते.

दरम्यान प्रवास करणाºया नागरिकांना हे दृष्य दिसुन आले असता नागरिकांनी याची माहिती जनसेवक,तथा काँग्रेस नेते पवन मस्के यांना दिली. मस्के यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत शाहीनिशा केली तर हा सर्व प्रकार दिसून आले .दरम्यान वृक्षाची विल्हेवाट लावण्यासाठी समाजसेवक पवन मस्के यांनी याची संबंधित विभागाला दिली संबंधित प्रशासनाने दखल घेत वाहतुक शाखेचे पोनि. शिवाजी कदम व न.प.मुखअधिकारी विनोद जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी अग्निशमन दलास पाचारण करून कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांच्या सहकायार्ने पडण्याच्या स्तिथीत आलेल्या वृक्षाची छाटनी करून महामार्गावरील वाहतुक सुरळीत सुरू करण्यात आली. . यावेळी सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के यांनी सदर विषयाची गंभीरतेने दखल घेवुन दाखविलेल्या तत्परतेविषयी नागरीकांनी पवन मस्के यांचे आभार

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *