दोन्ही किडनी निकामी झालेल्या फोटोग्राफरला महावितरण अधिकाºयांनी दिला मदतीचा हात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : तो महावितरणचा कर्मचारी नाही. महावितरणशी तो करारबद्धही नाही. तो आहे, फक्त एक सामान्य माणूस व उत्कृष्ट छायाचित्रकार. आपल्या कॅमे-यातून त्याने मागील ३० वर्षांपासून महावितरणच्या हजारो अधिकारी-कर्मचा-यांचे सुखदु:खाचे क्षण टिपले. त्यातून ऋणानुबंध निर्माण झाले. आज त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहे. तो जगण्याचा संघर्ष करीत आहे. अशा बिकट परिस्थितीत ते ऋणानुबंध स्मरणात ठेऊन महावितरणच्या अधिका-यांनी मार्टिन या फोटोग्राफरला नुकतीच १ लाख १० हजाराची रोख मदत दिली. तसेच यापुढेही सहकार्याचे आश्वासन देत या काळात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे सांगत मोठा दिलासा दिला. महावितरणचे नागपूर शहरातील कोणतेही कार्यालय असो या कार्यालयात सार्वजनिक कार्यक्रम असेल तर फोटोग्राफर मार्टिनच असेल असे पक्के समीकरण मागील ३० वर्षांपासून बनलेले आहे.

मार्टिननेही केवळ कॅमे-याच्या माध्यमातूनच नव्हे तर आपली लाघवी स्वभावातून महावितरणच्या कर्मचा-यांत स्वत:ची वेगळी व आपुलकीची ओळख निर्माण केली आहे. शिस्त, योग्य शॉट साठी धावपळ आणि उत्कृष्टतेचा ध्यास यामुळे स्मार्ट छायाचित्रासाठी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांना मार्टिनच पाहिजे असतो. ३० वर्षापासून अव्यवहातपणे घेतला. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी त्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. सर्वांच्या सहकार्याने आठवड्याभरात १ लाख १० हजाराची रक्कम जमा झाली. प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते ही रक्कम मार्टिन यांना देण्यात आली. या प्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सेवा देणा-या मार्टिनच्या दोन्ही किडन्या काही महिन्यांपासून निकामी झाल्या असून त्याला आठवड्यातून दोनदा डायलेसिस करावे लागते. तसेच औषधोपचारासाठी मोठा खर्च लागतो.

हा खर्च करताना मार्टिनची मोठी दमछाक होत होती. मार्टिनची ही गंभीर अवस्था बघून महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी विभाग प्रमुखाची बैठक घेऊन मार्टिनला रोख रकमेची मदत देण्याचा निर्णयशरद दाहेदार, अधीक्षक अभियंता, हरीश गजबे, उपमहाव्यवस्थापक (माहिती व तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, उपमहाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, उप विधी अधिकारी डॉ. संदीप केने, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी प्रवीण स्थूल प्रामुख्याने उपस्थित होते. या उपस्थितांसह वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक सावंत, नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता अविनाश सहारे, नागपूर शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे व त्यांच्या सहकारी कार्यकारी अभियंत्यांनी मदतीत योगदान दिले. मार्टिनला या पुढेही सहकार्य करण्याचा निर्णय महावितरणच्या अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी घेतला असून इतरांनीही मार्टिन यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.