अर्धवट रस्ता बांधकामाने घेतला पशुधन विकास अधिकार्याचा बळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बीरसी मार्गावर बिरसी गावाजवळ अर्धवट रस्ता बांधकामामुळे दररोज अपघात होऊन अनेक जीव गेले असून ३० मे रोजी तिरोडा येथून अंतिम संस्कार आटोपून तुमसर कडे जाणारे पशुधन विकास अधिकाºयाचा बळी गेला आहे. ३० मे रोजी तिरोडा येथील ऐडव्होकेट उमेश गंगापारी यांचे अंतिम संस्कार आटोपून रात्री ११ वाजता चे दरम्यान तिरोडाकडून बिरसी मार्गे तुमसर कडे आपले पॅशनप्रो मोटार सायकल क्रमांक एमएच ३६ – ८०४६ ने जातअसलेले खापा तुमसर येथे कार्यरत पशुधन विकास अधिकारी डॉ.जितेद्रगिरी गोस्वामी ५७ जात असता बीरसी गावाजवळील हेडाऊ आरा मशीन जवळ एका शेतकºयाने आक्षेप घेतल्यामुळे अर्धवट असलेले रस्त्याचे बांधकामा जवळील मातीचे ढिगºयावर आदळुन जागीच मरण पावलेण्

या अर्धवट रस्ता बांधकामामुळे दररोज लहान-मोठे अपघात होऊन जवळपास बारा लोकांचा जीव गेला असून या अपघाताची माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, ठाणेदार देविदास कठाळे आपले ताμयासह घटनास्थळी पोहोचून मृतकाचे शव खाजगी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून फिर्यादी कुणाल जितेंद्रगिरी गोस्वामी यांचे फिर्यादी वरुन अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जोगदंड करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *