गुणवंत विद्यार्थ्यांचा आ. राजू कारेमोरेच्या तर्फे गुणगौरव सोहळा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : इयत्ता १० वी व १२ वी परिक्षेत प्राविण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या शुभहस्ते शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित समाज सेविका रंजीता राजू कारेमोरे, मोहाड़ी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक तसेच गटशिक्षण अधिकारी मनीषा गजभिये, मोहाड़ी येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास मेश्राम, वार्ताहर तथागत मेश्राम, अरविंद येळणे, आकांक्षा वासनिक, अतुल भोवते, चेतन डांगरे, रवि बोरकर, कैलास बंसोड, पंढरीनाथ झंझाड़, अमित सुखदेवे, दिनेश कुकडे, कैलास तीतीरमारे, राजू केवट उपस्थित होते.

यावेळी इयत्ता १० वी चा निकाल ९५.२८ व १२ वी चा निकाल ९० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी असेच यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. एक चांगला भारतीय नागरिक म्हणून देशगौरव वाढवावा असे मार्गदर्शन आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांनी केले. या गुण गौरव सोहळा कार्यक्रमा मंध्ये विद्यार्थी, पालक, आई, वडील आणि आशा सेविका, आंगनवाड़ी सेविका सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती कैलाश तितिरमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच श्वेता अरविंद येळणे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.