मध्यप्रदेशात लवकरच सातवा व्याघ्रप्रकल्प

नागपूर : मध्यप्रदेशातील सातव्या आणि देशातील ५४ व्या व्याघ्रप्रकल्पाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या व्याघ्रप्रकल्पाला विरांगना दुर्गावती यांचे नाव देण्यात येणार असून, मध्यप्रदेशातील दामोह व सागर जिल्हादरम्यान दोन हजार ३३९ चौरस किलोमीटर त्याचे क्षेत्रफळ असणार आहे. राज्यातील सहा व्याघ्रप्रकल्पांच्या तुलनेत तो आकाराने सर्वाधिक मोठा व्याघ्रप्रकल्प असून गाभा क्षेत्र एक हजार ४१४ चौरस किलोमीटर तर बफर क्षेत्र ९२५.१२ चौरस किलोमीटर असणार आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाने मध्यप्रदेशातील नौरादेही आणि वीरांगना दुर्गावती अभयारण्याचा समावेश करून या सातव्या व्याघ्रप्रकल्पाला परवानगी दिली आहे. यापूर्वी वन्यजीव मंडळ तसेच केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने मंजुरी दिली होती. मध्यप्रदेशच्या वनखात्याने या व्याघ्रप्रकल्पाच्या अधिसूचनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनापूर्वी त्याची अधिकृत घोषणा केली जाईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *