तिरोडा नगर परिषदेच्या रस्त्यावर प्लॉट धारकाचे बांधकाम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील इंदोरा खुर्द येथील रहिवासी नितेश खोब्रागडे यांचा तिरोडा येथे प्लॉट असून त्यांचे प्लॉटसह तिरोडा नगर परिषदेचे रस्त्यावर त्यांचे प्लॉट शेजारील प्लॉट धारकांनी बांधकाम सुरू केले असता या बांधकामा संबंधित तक्रार करूनही या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने या प्लॉट धारकांनी येथे अवैध बांधकाम केल्याचा आरोप नितेश खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. १८ जून रोजी तिरोडा येथे झालेले पत्रकार परिषदेत इंदोरा खुर्द येथील रहिवासी नितेश शालिकराम खोब्रागडे यांनी सांगितल्यानुसार त्यांचा तिरोडा शहरात नेहरू वार्ड येथे मालमत्ता क्रमांक ५५ २५/१ नवीन क्रमांक ७७९ /१ मालमत्ता असून शेजारील प्लॉट धारकाने माझे प्लॉटवर अंदाजे २ फूट रुंद व ३० फूट लांब तसेच तिरोडा नगर परिषदेचे रस्त्याचे जागेवर अंदाजे ५ फूट रुंद व ५२ फूट लांब जागेवर अवैध्यरित्या अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले असता याबाबत तीन ३-४२३/८-५-२३ व १३- ६ -२३ ला लिखित तक्रार देऊन दोन-तीनदा मुख्याधिकारी नगरपरिषद तिरोडा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना संबंधित बांधकामा संबंधी तक्रार केली असतानाही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे संबंधित बांधकाम धारकाने स्लॅपपर्यंत बांधकाम केले असल्याची माहिती देऊन तक्रार केल्यानंतरही या तक्रारीकडे दुर्लक्ष करून बांधकामन थांबवल्यामुळे या अवैध्य बांधकामास तिरोडा नगर परिषदे कडून मूक संमती असल्याचे दिसून येत असल्याने नगर परिषदेने त्वरित यावर कारवाई न केल्यास आपल्याला न्यायाकरता संबंधित प्लाट धारक व नगर परिषदेचे विरोधात न्यायालयात धाव घ्यावी लागेल असेही नितेश खोब्रागडे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *