हत्तीचा कळप पुन्हा अर्जुनी मोरगाव तालुक्यात

अर्जुनी मोर : गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात प्रचंड धुमाकूळ घालून व मोठ्या प्रमाणात शेतीची नुकसान करीत असलेला हत्तीचा कळप पुन्हा भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी परिसरातील देऊळगाव बोदरा या परिसरात आज,५ डिसेंबरला सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सध्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा या पूर्व विदभार्तील जिल्ह्यात जंगली हत्तीचा मोठा धुमाकूळ सुरू आहे. दीड महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात या जंगली हत्तीच्या कळपाने प्रचंड धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान केले होते. त्यानंतर या जंगली हत्तीच्या कळपाने आपला मोर्चा गोंदिया जिल्ह्याकडे वळविला. यामध्ये अजुर्नी मोर तालुक्यातील नागणडोह हे आदिवासी गाव पूर्णत: निस्तनाबूत केले होते. तसेच तालुक्यातील जांभळी गावाजवळ एका माणसाला ठार सुद्धा केले होते. तसेच धान पिकाचे प्रचंड नुकसान करीत हत्तीचा कळप गोठणगाव, प्रतापगड मार्गे अर्जुनी मोर तालुक्यातील खैरी, सुकळी, दाभना, कवठा, बोडदे, बाराभाटी या परिसरात दाखल झाले होते. या गावांमध्येही हत्तींनी मोठ्या प्रमाणात धानाचे पुजने व मळणी झालेले धान्याचे पोत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. सोबतच काही शेतकºयांच्या फळबागांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर हा हत्तीचा कळप चान्ना, बाकटी, इंजोरी भागिरीटी या परिसरातून सिरेगावबांध मार्गे भंडारा जिल्ह्यात दाखल झाले होते. भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ घातल्यानंतर परत हा हत्तीचा कळप ५ डिसेंबरला साकोली तालुक्यातील सालेबर्डीच्या जंगल मार्गे अजुर्नी मोरगाव तालुक्यात दाखल झाला. सदर हत्तीचा कळप सालेबर्डीच्या जंगलातून बोंडगावदेवी जवळच्या देऊळगाव बोदरा या मार्गावरून बोदरा देऊळगाव तिडका जंगल परिसरात कंपार्टमेंट नंबर २८२2 कडे गेला असल्याची माहिती प्राप्त आहे. सर्व शेतकºयांनी सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *