अखेर जि.प.ची वाहन निवीदा प्रक्रिया रद्द

भंडारा : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित कंत्राटी तत्वावर वाहन पुरवठा निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याची शंका निश्चित झाल्याने अखेर सदर वाहन पुरवठा निविदा रद्द करण्याचे निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला असुन तसे लेखी आदेशसुध्दा काढण्यात आले आहे. भंडारा जिल्हा परिषदेअंतर्गत कंत्राटी तत्वावर वाहन पुरवठा करण्याबाबद आॅगस्ट २०२२ मध्ये निविदा काढण्यात आली होती.कंत्राटी वाहन निविदा ही पुर्णपणे ई-टेंडर प्रणालीदवारे काढण्यात आली होती.त्यासाठी इच्छुक पुरवठा धारकांचे दरपत्रक व सर्व प्रक्रिया ई-टेंडर च्या माध्यमातुन भरण्यात आली होती परंतु जिल्हा परिषदे प्रशासनाच्या संबंधीत विभागाने मनमर्जी कारभार सुरू केला होता.

पुरवठा धारकांच्या दरपत्रकामध्ये घोळ करून अनेक वाहन मालकांवर अन्याय करण्यात आला होता.निविदा प्रक्रिया पुर्णत्वास येईपर्यंत अनिश्चितता व घोळ घालण्यात आल्याचा आरोपही झाला. त्यासंदभार्ने जिल्हा परिषद प्रशासन ाकडे कुठलेही उत्तर नव्हते. यासंदर्भात विजय क्षिरसागर यांनी जि.प.च्या वाहन निविदा प्रकि- ्रयेत मोठया प्रमाणात घोळ झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली होती.त्यामध्ये जि.प.च्या वाहन पुरवठा ई-निविदा रद्द करण्याची मागणी केली होती.प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवुन अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने सदर वाहन निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला असुन तसे पत्र सुध्दा काढण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *