चिखलाने बरबटलेल्या रस्त्यावर उतरल्या महिला न.प.च्या भोंगळ कारभारा विरोधात काँग्रेसचे आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद भंडारा तर्फे नळ योजनेच्या जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या अर्धवट रस्त्याच्या भोंगळ कारभारा विरोधात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात २४ जून रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्वत्र चिखलाने बरबटलेल्या रस्त्यावर बसून महिलांनी नगर परिषद प्रशासना विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निषेध व्यक्त केला. भंडारा शहरातील खातरोड परिसरात असलेल्या यशोदा नगर व कृष्ण नगरी भागाला जोडणाºया मुख्य रस्त्यावर नगर परिषदेतर्फे नळ योजनेची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण भंडारा शहरात हे काम मागील काही वषार्पासून करण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी काम पूर्ण न करता अर्धवट सोडून आहे. आता पावसाला सुरूवात झाली असल्याने रस्त्याच्या खोदकामामुळे सर्वत्र चिखल होत असून नागरिकांना पायदळ चालता येईल, अस- ाही रस्ता शिल्लक राहिलेला नाही.

मुलांच्या शाळाही सुरू झाल्याने त्यांना ये-जा करणेही त्रासदायक होत आहे. तर एकही काम पूर्ण न करता जलवाहिनीचे काम सध्या बंद आहे. मात्र झालेल्या खोदकामाचा पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या या भोंगळ कारभारा विरोधात जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात आज चिखलाने माखलेल्या रस्त्यावर महिलांसोबत बसून निषेध आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाची दखल घेत नगर परिषद प्रशासक यांनी आपले प्रतिनिधी पाठवून समस्या जाणून घेतली. यावेळी परिसरातील रस्ते किमान येणे-जाणे होईल अशा स्थितीत सुरू करावे, तत्काळ काम सुरू न केल्यास आणखी मोठे आंदोलन करू असा इशारा जयश्री बोरकर यांनी नगर परिषद प्रशासकांना दिला. यावेळी कृष्ण नगरी, यशोदा नगर, राजस्वी नगर येथील महिला व नागरिक आंदोलनात सहभागी होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *