जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह होणार जोरदार पाऊस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया/भंडारा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार२७ जून २०२३ रोजी गोंदिया जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हवामान विभागाने आज, २६ जून जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार मंगळवार २७ जून रोजी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आॅरेंज अलर्ट दाखविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जोरदार ते ावरून नागरिकांना सूचना द्याव्यात असे जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. नागरिकांना सूचना हवामान खात्याने नागरिकांना खालील सूचना केल्या आहेत. संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरातच आश्रय घ्या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहा. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साठते ते टाळा.

मुसळधार पावसात वाहन चालवणे अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची सुद्धा शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे. जिल्हाधिकाºयांनी सर्व शासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देऊन सर्व तालुका यंत्रणांनी आपापल्या स्तर- टाळा. पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर राहा. फ्लॅश पूर चेतावणी आणि अद्यतनांसाठी सतर्कता आणि हवामान अहवालांचे निरीक्षण करावे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.