राष्ट्रीय महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा!

प्रतिनिधी गोंदिया:मे.अग्रवाल ग्लोबल कंपनीतर्फे साकोली ते शिरपूरबांध या रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे तीन वर्ष लोटून देखील काम अपूर्ण आहे. परिणामी खड्डयांची चाळण होऊन अपघातांचे सत्र सुरूच आहे. महामार्गावर दररोज अपघात होत असून मृत्युच्या सापळ्यातून वाहनचालकांची मुक्ती कधी होणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. अनेकदा या मार्गावर किरकोळ अपघातही झाले आहे. मात्र संबंधित विभाग निद्रावस्थेत असल्याचे दिसत आहे. तर लोकप्रतीनिधी जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून केवळ एकमेकांची उणीधुनी काढण्यातव्यस्त आहे. ही शोकांतिका आहे. रस्त्याची दयनीय अवस्था व खड्ड्यांनी प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी एका बाजूने रस्ता बंद आहे, तर दुसºया बाजूचे केवळ एक लेन सुरू असल्याने आहे.

मुरदोली घाटात व फाट्याजवळ मोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गावर बाप लेकांना अपघात जीव गमवावा संबधित बांधकामाचे कंत्राट असलेल्या कंपनीने तत्काळ काम करण्याची दखल घेतली नाही.यावरून प्रशासन जीवघेण्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहे का, असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कंत्राटदार कंपनीच्या वाहन चालकांची मनस्ताप होत लागला. तरी देखील रस्ता ढिसाळ कारभारामुळे व स्थानिकसंबधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे या महामार्गावर जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे. देवरी कोहमारा मार्गाने गरोदर महिला, रुग्ण, वेळेत रुग्णालयात पोहोचत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. मोटारसायकलस्वार घसरून पडून जखमी होताहेत. खड्डयात बस फसत आहेत. तर वाहनांमध्ये सतत बिघाड होऊन खिशाला कात्री बसत असल्याच्या अशा तक्रारी व ओरड वाहन चालकांमधून होतेय. आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर या मार्गावरील उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण होईल, की प्रशासन एखाद्या मोठ्या अपघाताची वाट तर पाहत आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *