पुरात अडकलेल्या ८० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी चंद्रपूर : शहरात अतिवृष्टीपेक्षा अधिक सुमारे २४० मिलीमीटर पाऊस पडल्याने पूरपरिस्थिती उद्भवण्याची संभावना होती. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीस तोंड देण्यास महानगर पालिका प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन चमुने शहरात राष्ट्रवादी नगर, रहमत नगर, जलनगर, तुकूम येथील संभाव्य पूरग्रस्त भागात मोहीम राबवून ८०0 नागरिकांची सुटका केली व त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. आपत्ती व्यवस्थापन चमुने मुसळधार पावसामुळे अडचण निर्माण झालेल्या अनेक शाळकरी मुलांना सुरक्षित घरी पोहचविले व अनेक नागरिकांना मनपा शाळांमध्ये स्थलांतरित सुद्धा केले. यात महात्मा गांधी कन्या शाळा रय्यतवारी वॉर्ड येथे ४५, महात्मा फुले शाळा घुटकाळा वॉर्ड येथे १३०, स्वामी विवेकानंद शाळा वडगाव येथे ४४ नागरिकांना आश्रय उपलब्ध करून देण्यात आला.

शाळेत जेवण, पिण्याचे पाणी, झोपण्याची सोय, आरोग्य व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या तसेच ११४ नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार प्रथमोपचार व औषधे देण्यात आली. स्वच्छता कर्मचाºयांद्वारे छोटे व मोठे नाले येथे जो कचरा अडकला होता ज्यामुळे पाणी थांबून रस्त्यावर यायचे असे नाले मोकळे करण्यात आले. ज्या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती होती त्या भागात त्याजागीनिजंर्तुकीकरण करण्यास ब्लिचिंग पावडर टाकणे, फॉगिंग, फवारणी करण्यात आली आहे. या कामात २५० ते ३०० स्वच्छता कर्मचारी सतत कार्यरत आहेत. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे, मंगेश खवले, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सचिन माकोडे, राहुल पंचबुद्धे पुर सदृश्य भागात प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत व संभाव्य परिस्थितीसाठी सज्ज आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *