भंडारा येथे ई-आॅफिस प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: शासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी राज्य शासनाने मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयात ई-आॅफिस प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शुक्रवार दि. २५ आगस्टला जिल्हा परिषद भंडारा येथे ई-आॅफिस प्रणाली प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात घेण्यात आली. कार्यक्रमाला भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत उमेश नांदगवळी, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी मोहन तेलमासरे, पंचायत विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी अजय भदोरीया इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी संदर्भात सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, महिला व बालविकास, अवाक-जावक विभाग व माहिती तंत्रज्ञान विभाग मधील अधिकारी तसेच कर्मचारी यांना प्रक्षिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळेत भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी कर्मचारी यांना शासकीय कामकाजात संगणकाचा अधिकाधिक वापर करून कामकाज गतिमान करण्याचे निर्देश दिले. तसेच कर्मचाºयांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रशिक्षक म्हणून महा-आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक फारूख शेख, महा-आयटीचे जिल्हा सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक योगेश बांगळकर, अभियंता वरिष्ठ सॉμटवेअर सागर ठाकरे यांनी सविस्तर दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.