यवतमाळात ‘नीट’ मधील ‘मुन्नाभाई’ चा भांडाफोड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पार करून देण्यासाठी ‘डमी’ उमेदवार बसविण्याचा प्रकार समोर आला असून यवतमाळ पोलिसांनी या ‘मुन्नाभाई’सह आंतरराज्य रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात ७ मे २०२३ रोजी कार्तिक सुभाष कन्हे (वय २६, लिपिक पोदार स्कूल, यवतमाळ) यांनी तक्रार दिली. यानुसार त्यांच्या शाळेत एनटीए दिल्लीमार्फत ‘नीट’ परीक्षा होणार होती. त्याकरिता एनटीएने पुरविलेल्या बायोमॅट्रीक आयडेंटीफिकेशन व चेहरा पडताळणी करणारे इनोवेटिव्ह कंपनीचे प्रमुख पवन रमेश डोंगरे यांच्याकडून उमेदवारांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर ही माहिती एनटीएला पाठ- विण्यात आली असता उमेदवार आकार चंद्रकांत पाटील (कोपरी पालघर जि. पालघर) याची फेरतपासणी करण्याबाबत कळविण्यात आले. फेरतपासणीनंतर या आकारच्या जागी जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी (वय २२, बिकानेर, राजस्थान) व महावीर सिखरचंद नाई (गयाशहर, बिकानेर) यांनी नीटची परीक्षा दिल्याचे समोर आले.

आरोपीने बनावट प्रवेशपत्र व बनावट आधारकार्ड तयार करून ते वापरून नीट परीक्षा देऊन फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी कलम ४०६, ४१७ ४२०, ४६५, ४७१ भादंविनुसार गुन्हानोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला असता परीक्षेला बसलेले डमी उमेदवार जितेंद्र गाठचौधरी व महावीर नाई यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, इतर आरोपी आकार चंद्रकांत पाटील, गजानन मधुकर मोरे (वय ३६, नांदेड), नागनाथ गोविंद दहीफळे (वय ४२, नांदेड), राजीव रामपदार्थलाल कर्ण (वय ४४, झारखंड) व नरेश बलदेवराम बिष्णोई (वय २२, जोधपूर) यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे यातील आरोपी १, २ व ७ हे दिल्ली येथे वैद्यकीय शिक्षण क्रमाचे विद्यार्थी असून आरोपी ४ व ५ हे नांदेड येथील नीट परीक्षेच्या खाजगी शिकवणी वर्गाशी संबंधित आहेत. यात सहभागी गुन्हेगार वैद्यकीय शिक्षणाकरिता होणाºया नीट परीक्षेकरिता जागोजागी डमी उमेदवार बसवून आंतरराज्य रॅकेट चालवित असल्याचे निष्पन्न झाले. याच पद्धतीचा गुन्हा आरोपी नरेश बिष्णोई याच्यावर दिल्ली येथेही दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक आधारसिंग सोनोने, अमोल मुडे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सतीश फुके यांनी पार पाडली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *