जननायक, महामानव बिरसा मुंडा यांचा संघर्ष प्रत्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायक – राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : आदिवासी समाज ब्रिटीश सरकार व जमीनदाराचे दमन अश्या दुहेरी शोषणात जिवन जगत होता. या शोषणाविरुद्ध आदिवासी समाजात जागृती करून महामानव, जननायक बिरसा मुंडा यांनी आवाज उठवला होता. त्यांनी जल, जंगल, जमीन च्या हक्कासाठी बलिदान देऊन आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्रवीर ठरले, येणाºया कित्येक पिढ्या त्यांच्या या संघषार्तून प्रेरणा घेतील असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी केले. आदिवासी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा स्मारक समिती व आदिवासी विकास संस्था च्या वतीने हनुमान मंदिर परिसर मेंगाटोला (पाथरी) येथे महामानव क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा १४८ जयंती समारोह व ध्वजारोहण सोहळा माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेत पार पडला. माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी क्रांतिसूर्य, भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व जनजातीय गौरव दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी राजेंद्र जैन, केवल बघेले, केतन तुरकर, पन्नालाल बोपचे, सुनील कापसे, अनिल मडावी, ब्रिजलाल बिसेन, दूनेश्रर , भूमेश्वर राऊत, के. एल. वरखडे, गिरिपुंजे , घनश्याम येल्ले यांच्यासह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.