त्रिकोणी पे्रम प्रकरणातुन ‘त्या’ युवकाची हत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी जवाहरनगर :- त्रिकोणी प्रेम प्रकरणातून नयन मुकेश खोडपे वय १९ वर्ष रा. पांढराबोडी ( भंडारा) यांचा तीन मित्राने काटा काढून गळा आवरून खून केल्याचे सिद्ध झाल्याने तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्रिकोणी प्रेम प्रकरणातून आरोपी सोबत मृतक नयन याचे पंधरा दिवसांपूर्वी पांढराबोडी गावालगत भांडण झाले होते.या भांडणातून प्रेमात आडवा का आलास हा संशय ठेऊन मुख्य आरोपी मंथन अशोक ठाकरे वय १९ वर्ष रा.भोजापुर याने मित्र साहिल शरद धांडे वय १९ रा.ठाणा पेट्रोल पंप व प्रेयसी मुलगी वय १९ रा. बीड सितेपार यांची मदत घेऊन दिनांक २७ नोव्हेंबर ला फोन करून भंडारा येथे बोलावून घेतले.तिथून मृतक त्या युवतीला घेऊन मोटासायकल ने नांदोरा झीरी या पर्यटनस्थळी येऊन गप्पा गोष्टी करीत होते त्या नंतर दुपारी मंथन व साहिल दोघेही एका मोटासायकलनी नांदोरा झीरी या ठिकाणी येऊन मृतकासोबत मंथन यांनी भांडण करून जबर मारहाण केली.ते इथेच न थांबता, हिरव्या दुप्पट्ट्याने जीव जाई पर्यंत झाडाला बांधून गळा आवरून मारहाण केली .त्यानंतर मृतकला तिथेच ठेऊन तिघेही ट्रीपल सीट सालेबर्डी मार्ग भंडारा येथे आले त्याच रात्री आरोपी दोघेही मित्र बेधुंद नशा करून त्याच रात्री पुन्हा नांदोरा झीरी येथे झाडाखाली पडून असलेल्या घटनास्थळी नयन जवळ येऊन हा मेला की जिवंत आहे

याची शहानिशा करण्यासाठी आले असता नयन हा मृत पावल्याचे लक्षात येताच त्याला उचलून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने पंडित नाल्यातील लहान पुलावरून गोसे धरणाच्या ‘ बॅक वॉटर’च्या पाण्यात फेकून दिले. व त्याची मोटासायकल घटना स्थळावरून उचलून मोटासायकल क्रमांक एम.एच. ४० ए. ए.४१२४ भंडारा तहसील कार्यालय जवळील मोडक्या इमारतीजवळ फेकून दिली. यावेळी हे दोघेच मित्र होते फिर्यादी मृतकाचे भाऊ व नातेवाईकांनी सुरुवातीलाच मंथन वर संशय व्यक्त केला होता व त्या दिशेने तपास करीत पोलिसांनी मंथन याला ताब्यात घेतले . मृतक हा २७ ला सकाळी १० वाजता घरून मोटासायकल क्रमांक एम.एच.४० ए. ए.४१२४ भंडारा येथे आला तिथून प्रेयसी सोबत मोटासायकलने तो पुढे निघाला. त्याची मोटासायकल भंडारा तहसील कार्यालय जवळीलमोडक्या इमारतीजवळ ठेवलेली आढळून आली दुसरा आरोपी साहील शरद धांडे हा सायंकाळी नशा करून ठाणा पेट्रोल पंप येथील पान टपरीवर येथून बेधुंद नशेत जोर जोराने ओरडुन सांगत होता की मैने अभी-अभी एक को टपकाया है, यावर पान टपरीवर उपस्थितांनी विश्वास केला नाही जेव्हा या खून प्रकरणाच्या बातम्या झळकल्या तेव्हा आज सकाळी साहिल च्या बोलण्याची चर्चा ठाणा पेट्रोलपंप येथे चर्चेत आली. त्यापूर्वी पोलिसांनी साहिल ला सकाळीच त्यांचे घरून अटक केली. व युवती आरोपीस बीड सीतेपार येथून अटक करून गुन्हा ३०५/२३ कलम ३०२,२०१ दाखल करून पुढील तपासासाठी अटक केली. पुढील तपास ठाणेदार सुधिर बोरकुटे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *