रेल्वे गाडीतून फराळाचे ट्रे चोरणाºया टोळीस अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे डब्यातून लाखो रुपये किंमतीचे फराळाचे ट्रे चोरणाºया आठ चोरट्यांना रेल्वे सुरक्षा बल गोंदियाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई २४ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. चोरी करणाºया या टोळीत तीन विधी संघर्षीत बालके तर पाच वयस्कांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत गोंदिया रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या ६ एसी कोच (चेअर कार)मधून सीटच्या मागे लावलेल्या लोखंडी ३०० हून अधिक फराळाचे ट्रे तोडून चोरून नेले. ते ट्रे भंगार खरेदीदारांना विकले. ही माहिती मिळताच आरपीएफ गोंदिया येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणातील चोरांचा शोध घेण्यासाठी आरपीएफ नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ गोंदिया आणि आरपीएफ गुप्तचर शाखेचे अधिकारी, कर्मचाºयांची दोन पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रस्त्यांवर आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मोबाइल टॉवरच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. जुन्या गुन्हेगारांना पकडून त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर २४डिसेंबर रोजी संध्याकाळी पथकाने ३ अल्पवयीन आणि २ रद्दी दुकान चालकांसह ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून स्नॅक ट्रेचे छोटे तुकडे (एकूण १२४ किलो) चोरीला गेले. चोरीत वापरलेली अ‍ॅक्टीव्हा स्कूटर जप्त करण्यात आली. सात आरोपींंना अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *