सुनील केदार यांच्या जामिनावर आज निर्णय

नागपूर : काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर सरकारी वकिल व केदार यांच्या वकिलांत जोरदार युक्तीवाद झाला. ‘बँकेचे पैसे बुडवणाºया कंपन्यांविरोधात केदार यांनी स्वत: एफआयआर दाखल केली. त्यामुळे सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, असा युक्तीवाद केदार यांचे वकिल देवेन चव्हाण यांनी केला. तर सरकारी वकिल अजय मिसर यांनी जामिनाला कडाडून विरोध केला. या दोन्ही वकिलांचा युक्तीवाद झाल्यानंतर या प्रकरणी उद्या बुधवारी जिल्हा सत्र न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *