बारावीच्या विद्यार्थ्यांना भागाकार जमेना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई: देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाºया असर या सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक दुर्दशावताराचे दर्शन घडले आहे. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण ६८ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आला नाही तर इयत्ता दुसरीच्या स्तराचा मराठीतील परिच्छेद जवळपास २१ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आला नाही, तर सोपी इंग्रजीतील वाक्ये जवळपास ३९ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आली नाहीत.

शैक्षणिक प्रवाह, विद्यार्थ्यांचा शाखा निवडीसाठीचा कल याचीही पाहणी करण्यात आली असून कौशल्य विकास अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचे प्राधान्य नसल्याचे दिसते आहे. प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने देशभर केलेल्या अ‍ॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन (असर) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष बुधवारी जाहीर केले. यंदा राज्यातील फक्त नांदेड जिल्ह्यातच हे सर्वेक्षण करण्यात आलेहोते. असरचा यंदाचा पंधरावा अहवाल आहे. गेल्या पंधरा अहवालांप्रमाणेच राज्याच्या शैक्षणिक अधोगतीचे दाखले यंदाच्या अहवालानेही दिले आहेत. यंदा १४ ते १८ वर्षे या वयोगटातील म्हणजे साधारण आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिक, गणिती कौशल्ये, त्याचे प्राथमिक पातळीवर उपयोजन अशा बाबींचे १२०० घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *