सहा. पुरवठा निरीक्षक भैसारे यांच्यावर गुन्हा नोंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील गौतम बुध्द वार्ड मेंढा येथील राशन दुकानदार महिलेशी असभ्य वर्तन करून दुकान बंद करण्याची धमकी देणाºया भंडारा तहसील कार्यालय पुरवठा विभागातील सहा.पुरवठा अधिकाºयाविरोधात भंडारा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भाऊराव दिवान भैसारे वय अंदाजे ४२ रा. डॉक्टर कॉलनी बेला असे आरोपीचे नाव असुन त्यांच्यावर भंडारा पोलीस स्टेशन मध्ये कलम ३५४, ३५४ (अ), ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार भंडारा तालुका अन्न पुरवठा विभागातील सहाय्यक पुरवठा निरीक्षक भाऊराव भैसारे हे दर महिन्याला पिडीतेच्या गौतम बुध्द वार्ड मेंढा येथील राशन दुकानात चार ते पाच वेळा चौकशीसाठी येवुन विनाकारण त्रास देतात. चौकशीदरम्यान त्यांनी राशन दुकानाबद्दलचे मागीतलेल्या सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनसुध्दा सहा. पुरवठा अधिकारी भैसारे यांच्याकडुनविनाकारण त्रास देणे सुरूच होते . एवढेच नाही तर वारंवार दुकानात येवुन दुकानाची टिपणी रद्द करून तुझ्या दुकानाचे लायसन्स निलंबीत करून तुला पाहूण घेण्याच्या धमक्या देत असत.

दि. २१ जानेवारी रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास पिडीत महिला राशन दुकानदार या त्यांच्या दुकानात उपस्थित असतांना त्यावेळी परिसरातील ग्राहक सुध्दा राशन दुकानात राशन घेण्यास उपस्थित असतांना सहा.पुरवठा निरीक्षक श्री.भैसारे यांनी राशन दुकानात जावुन आपण पुरवठा अधिकारी असल्याचे सांगुन दुकानाची तपासणी करण्याकरीता आलो असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यावर पिडीत महिलेने तुम्ही सुट्टीच्या दिवशी राशन दुकानाची टिपणी कसे काय मागता असे विचारले असता मी अधिकारी आहे, मला सगळा अधिकार असल्याचे त्यांनी उत्तर दिले. त्यावर पिडीत महिलेने मला लेखी द्या मी तुम्हाला सर्व कागदपत्रे देते असे बोलले असता श्री.भैसारे यांनी पिडीत महिलेला बाजूला बोलवून महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत पिडीत महिलेचा हात पकडला.पिडीतेने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यावर भैसारे यांनी राशन दुकानाची खोटी टिपणी करून पुर्ण पंचनामा तयार करून राशन दुकानाचे लायसन्स रद्द करण्याची धमकी दिली. त्यामुळे वारंवार होणाºया त्रासाला कंटाळुन अखेर पिडीत महिलेने भंडारा पोलीस स्टेशन गाठुन तक्रार नोंदविली. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *