छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाची प्रेरणा – आदित्य लोहे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : छत्रपती शिवाजी महा- राज म्हणजे प्रत्येक माणसाची प्रेरणा, विद्यार्थ्यांचा आदर्श, विश्व विश्व बंधुत्व, विश्व कल्याण, शुन्य आणि अनंत. प्रत्येक माणसाला सकारात्मतेने जगायला शिकविणारे शिवराय. कुणालाही विरोध न करता जातीवाद संपविणारे शिवराय, आपल्या धर्माचा उदो-उदो न करता आपल्या धर्माचा अभिमान बाळगतांना इतर धर्मांनाही यथायोग्य सन्मान देणारा रयतेचा राजा म्हणजे शिवराय. आज आपण जे आयुष्य जगतोय त्याचे जनक म्हणजेच छत्रपती शिवाजी महारज आहेत, असे मत प्रसिद्ध शिव व्याख्याते आदित्य लोहे यांनी ‘युद्धापलीकडचे छत्रपती शिवराय’ या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण व पारेषण कंपनी, नागपूर परिमंडलांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव-२०२४ याप्रसंगी ते बोलत होते. स्वराज्य, सुराज्य, रयत, राजा, छत्रपती, गडकिल्ले, वेळ, नियोजन, व्यवस्थापन, यश या सर्वांचे एकत्रित नाव म्हणजे शिवछत्रपती. आपल्या धमार्सोबतच देशाची संस्कृती आणि परंपरा देखील जतन केल्यानेच आज ३९४ वर्षानंतरही शिवाजी महाराजांचे आयुष्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

शिवाजी महाराजांनी शेतकºयासह रयतेला देशाचा केंद्रबिंदू मानले होते. शेतकरी सुखी तर देश सुखी अशी त्यांची शेतकºयाप्रती भूमिका होती. शेतकºयांना त्यांनी शेतीसोबतच व्यवसायिक देखील केले. स्त्रियांविषयी त्यांची आदर व सन्मानपूर्वक वागणूक होती. शिवाजीमहाराज हे रयतेवर जीवापाड प्रेम करत होते आणि म्हणूनच त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय आनंदी व सुखी होती. त्यांनी आपला धर्मच नव्हे तर भारताती संकृती व परंपरा देखील जपली. त्यांचा माणस तोडणारा नव्हे तर माणस जोडणारा धर्म होता, स्वत:च्या धर्माचा अभिमान बाळवून दुसºयांच्या धर्माचा मान-सन्मान करणे हा शिवबांचा धर्म होता. कष्टकरी माणसाला त्याच्या कष्टाचा मोबदला म्हणून वेतन सुरु करणारा पहिल राजाम्हणजे शिवराय, मानसशास्त्राचा बाप म्हणजे शिवराय, गृहरक्षक दल, आरमार, रोजगार निर्मितीला चालना देणारा राजा, मराठी भाषा शुद्धीकरण, मराठीचा पहिला शब्दकोष लिहून घेणारा राजा, एक महान उद्योजक राजा म्हणजे शिवराय असे अनेक प्रसंग आदित्य लोहे यांनी आपल्या तेजस्वी वाणीतून उपस्थितांपुढे मांडले. महापारेषणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सतिश अणे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या व्याख्यानाप्रसंगी महावितरणचे अधीक्षक अभियंता हरिश गजबे यांचेसह महावितरण व महापारेषणचे अनेक अभियंते, अधिकारी व कर्मचारी, विविध कामगार संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत नानोरे, संचलन प्रशुन श्रीवास्तव तर आभार प्रदर्शन राजेश पोफळी यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.