मतदारांवर दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्वरीत माहिती द्या -निवडणूक निरीक्षक जाटव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी आता एकूण १५ उमेदवार रिंगणात असून कुठेही मतदारांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव किंवा धमकाविण्याचे प्रकार आढळल्यास त्याची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन सामान्य निवडणूक निरीक्षक लोकेशकुमार जाटव यांनी केले. राजकीय पक्ष व उमेदवारांच्या प्रतिनिधींना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री. जाटव बोलत होते. बैठकीला निवडणूक खर्च निरीक्षक हेमंत हिंगोनिया, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक सुजीत दास, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी आणि राजकीय पक्षांचे/उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्री. जाटव म्हणाले, जिल्ह्यात किंवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या क्षेत्रात मतदारांवर दबाव टाकणे किंवा धमकाविण्याचे प्रकार निदर्शनास येत असतील, त्याची माहिती त्वरित कळवावी. जेणेकरून अशा क्षेत्रात पोलिसांसह अतिरिक्त मनुष्यबळाचे व्यवस्थापन करता येईल. तसेच धमकाविणाºयांवर कडक कारवाईसुध्दा केली जाईल. निवडणुकीच्या काळात नागरिकांना किंवा अन्य कोणालाही तक्रार करावयाची असल्यास सी-व्हीजील अ‍ॅपचा उपयोग करावा. या अ‍ॅपवर तक्रार आणि फोटो अपलोड केल्यास १०० मिनिटांमध्ये त्याचे निराकरण करता येते. निवडणुकीच्या संदर्भातील आॅनलाईन परवानगी करीता ‘सुविधा’ अ‍ॅप विकसीत करण्यात आले आहे. उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सुविधा अ‍ॅपचा वापर करावा. आॅफलाईन परवानगीकरीता ‘एक खिडकी’ योजनासुध्दा उपलब्ध आहे, असे सामान्य निवडणूक निरीक्षक श्री. जाटव यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.