वाचनालयाच्या कामात प्रचंड घोळ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- सन २०२२-२३ मध्ये भंडारा शहरातील नाशीकनगर, वैशालीनगर, संत रविदास मंदीर, कपिल नगर, येथील बौध्द विहारामध्ये अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत वाचनालयतयार करण्याचे काम ज्याची अंदाजित किंमत जवळपास ३.५० करोड रुपये मे. प्रिया कुलर स्टिल इंडस्ट्रीज भंडारा या एजंसीला देण्यात आले. त्या अंतर्गत वेगवेगळी कामे जसे रिनोवेशन, लायब्ररी फर्नीचर, डिजीटल लायब्ररी ची कामे अंदाजपत्रकानुसार न करताच थातुरमातुर कामे करून करोडो रूपयाच्या निधीची जनप्रतिनिधी व अधिकाºयांना हाताशी धरून कंत्राटदाराने लुट केल्याचा आरोप शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आला आहे.सदर कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी भंडारा जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. सदर कामांच्या अंदाजपत्रकानुसार भंडारा शहरातील नाशीकनगर, वैशालीनगर, संत रविदास मंदीर, कपिल नगर येथे डिजीटल लायब्ररी करतांना उच्च प्रतिचे दरवाजे, टेबल, खुर्च्या , लॉकर कपाट, पार्टीशन, संगणके पुरवायचे होते. परंतु कंत्राटदाराने सदर साहित्य अगदी हलक्या दर्जाचे पुरविले असून संगणकामध्ये सॉफ्टवेअर मारून द्यायचे होते, पुस्तके डाऊनलोड करून हार्डकॉपी ठेवणे बंधनकारक होते, वाय-फाय कनेक्शन नसल्यामुळे एकंदरीत या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासल्या गेल्याचे चित्र निर्माण झालेले आहे.

सदर अंदाजपत्रकामध्ये ज्या ठिकाणी डिजीटल लायब्ररी करायची होती त्या जागेच्या रिनोवेशनचे सुध्दा अंदाजपत्रक तयार करण्यात आले खरे, परंतु प्रत्यक्षात कोणतेही काम न केल्यामुळे आजही पाऊस पडला की, स्लॅबमधून पाणी गळण्याचे प्रकार अनुभवयास मिळतात, त्यामुळे ज्या डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामान्यांकरीता शिक्षणाची दालने उघडली त्यांच्याच बौध्द विहारात अशा प्रकारचे बोगस कामे करून भ्रष्टाचाराला थारा दिल्या जाते हे अतिशय संतापजनक असुन हया योजनेद्वारे जवळपास ३.५० करोड रू. च्या कामामध्ये फक्त ५०-६० लक्ष रूपयात काम आटोपुन उर्वरीत रक्कम खिशात घातल्या गेल्याने या सर्व कामाची उच्चस्तरीय चौकशी करून कंत्राटदाराला काळया यादीत टाकुन दोषी अधिकाºयांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.निवेदन देतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, भंडारा शहर प्रमुख आशिक चुटके, शहर संघटक शैलेश खरोले, माजी तालुकाप्रमुख, पं. स. उपसभापती ललित बोंद्रे, उपशहर प्रमुख राकेश आंग्रे, युवासेना शहर अधिकारी हर्षल टेंभुरकर, प्रमोद बोरकर, चित्रांगद सेलोकर, नाना मते, विकास बागडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *