भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नुकत्याच १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे उदघाटन न्यायमुर्ती एम. डब्लू. चांदवाणी साहेब न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुबंई, खंडपीठ नागपुर तथा पालक न्यायमुर्ती यांचे हस्ते तसेच राजेश अस्मर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाले. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण ५५८ प्रलंबित प्रकरणे तर पूर्वन्यायप्रविष्ठ २७० प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली.

या लोकअदालतीमध्ये सर्व फौजदारी व दिवाणी न्यायालये, कौटुंबीक न्यायालय, कामगार न्यायालय, औद्योगीक न्यायालयात प्रलंबीत असलेली एकुण २९९६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २२ मोटार अपघात प्रकरणे, ७ एन, आय, अॅक्ट प्रकरणे, १३३ रक्कम वसुलची प्रकरणे, फौजदारी तडजोड पात्र व इतर फौजदारी प्रकरणे २६१, दिवाणी स्वरूपाची २१, प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकअदालत मध्ये मा. ए. के.शाह जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, भंडारा, मा. जे. आर. घाडगे, ४ थे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, भंडारा, मा. श्री. ए. जी. मस्के २ रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, (जलदगती न्यायालय), श्री. एस. एच. वानखेडे, ५ वे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठभंडारा मा. श्रीमती एस. एल. सोयंके, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी, भंडारा, यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहीले तर पॅनल सदस्य म्हणून अॅड. श्रीमती मंजुषा गायधणी, अॅड. श्री. आर. एम. वाडीभस्मे, अॅड. श्री सुधीर आर. मेश्राम, अॅड. श्री. आर. व्ही सोनटक्के, अॅड. श्रीमती शुभांगी एम. नंदनवार यांनी काम पाहीले. तथा याच राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नी व मुलांना लोकअदालतीच्या माध्यामातुन नूकसान भरपाई लवकर मिळण्यास मदत झाली.
अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी न्यायालयात अनेक दावे दाखल करण्यात आलेले असतात, पंरतु, न्यायालयात अशी प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबीत असल्यामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्वरीत नूकसान भरपाई मिळत नाही, अशा प्रकरणात मुत्यू पावलेली व्यक्ती कुटूंब प्रमुख असला तर त्याच्या कुटूंबीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जिल्हा न्यायालय, भंडारा येथे यावेळी मोटार अपघात प्रकरणांसाठी एक पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. पॅनल प्रमुख म्हणून मा. श्री. ए. के. शाह, जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, भंडारा यांनी काम पाहीले.
मोटार अपघाताची एकुण २२ प्ररकणे निकाली करढण्यात आली. अशाच एका प्रकरणात कुटूंबप्रमुखाचा मुत्यू २०/१०/२०२० ला झाला व ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते लोकअदालतीच्या माध्यमातुन या प्रकणात १९ लाख रुपये नुकसान भरपाई इफको टोकीयो इन्शुरंश कंपनी कडून पिडीत पक्षका- राच्या परिवाराला देण्यात आले. पिडीत पक्षका कडून अॅड. सरला बोरकर यांनी तर विमा कंपनी कडून अॅड. व्ही एम. दलाल यांनी काम पाहीले. लोकअदालतीच्या माध्यमातुन प्रकरण निकाली काढल्यामुळे पक्षकाराला दिलासा मिळाला. लोकअदालतीच्या आयोजनासाठी केलेल्या सहकार्यबददल जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव श्री. मिलींदकुमार विनायक बुराडे यांनी सर्व न्यायिक अधिकारी, पॅनल सदस्य, अधिवक्ता, कर्मचारी, पोलीस प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी व पक्षकारांचे आभार मानले.