भंडारा पत्रिका / प्रतिनिधी कन्हान : विद्यार्थ्यांनी शालेय वयात खूप खाऊन पिऊन तंदुरुस्त रहावे व अभ्यासाकडे नियमितपणे लक्ष द्यावे, असे मौलीक मार्गदर्शन सेवानिवृत्त पोलीस महासंचालक श्री डी शिवानंद यांनी केले. धर्मराज शैक्षणिक परिसरात आज (ता १५) त्यांनी धर्मराज प्राथमिक शाळा व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. लहान मुलांमध्ये परमेश्वर असून यांच्या आनंदात सहभागी होता येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. धर्मराज प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. हरिष पोटभरे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून रोटी फाऊंडेशनचे संस्थापक व सेवानिवृत्त पोलीस महासंचालक श्री डी शिवानंद उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटी फाऊंडेशनचे समन्वयक श्री सी. एम बगारीया, श्री संजय सरकार, श्री संजय पन्नासे, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, पर्यवेक्षक श्री राजूसिंग राठोड उपस्थित होते.

यावेळी धर्मराज प्राथमिक शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस महासंचालक श्री डी शिवानंद यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मंचावरील सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रोटी फाऊंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना चिक्की, कंपास बॉक्स, बिस्किट चे वाटप करण्यात आले. रोटी फाऊंडेशनच्या मदतीने गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना पूरक आहाराचे वाटप करण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी प्रास्ताविकात नमूद करून रोटी फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार श्री यशपाल गंगराज यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री गणेश खोब्रागडे, श्री यशपाल गंगराज, कु शारदा समरीत, कु अर्पणा बावनकुळे, कु पूजा धांडे, कु उत्तरा बन्सोड, माला मदनकर, सौ सरीता बावनकुळे, सौ सुषमा आरेकर, श्री संजय साखरकर यांनी सहकार्य केले.