
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : भेल कारखान्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीबाबत न्यायालयाने शेतकºयांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत शेतकºयांनी कंपनी परिसरात विजयोत्सव साजरा केला. मात्र पोलिसांनी आचारसंहितेचा दाखला देत जमाव रोखण्यासाठी अचानक दिलेल्या नोटिसांवर शेतकरी आणि जनप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या नोटिसांमुळे अनेक शेतकरी कार्यक्रमाला पोहोचू शकले नाहीत, यावर डॉ. फुके यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर गंभीर आक्षेप घेतला. न्यायालयाने भेल कारखान्याला देण्यात आलेल्या जमिनीच्या वादात शेतकºयांच्या हिताचा निकाल देत न्याय दिला. यामुळे क्षेत्रातील पीडित शेतकºयांमध्ये आनंदाची लहर पसरली. हा निर्णय साजरा करण्यासाठी कंपनी परिसरात डॉ. फु- के यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु १९ तारखेच्या रात्रीच मुंडीपार व परिसरातील शेतकºयांना पोलिसांनी आचारसंहितेचे कारण देत जमाव न जमवण्याची नोटीस दिली.
शेतकºयांचे म्हणणे आहे की कार्यक्रमाचे ठिकाण आचारसंहितेच्या कक्षेतच नसतानाही पोलिसांनी कृत्रिम निर्बंध लादले. शेतकºयांची संख्या अपेक्षेपेक्षा कमी राहण्यामागे पोलिसांच्या दबावतंत्राला जबाबदार धरत डॉ. परिणय फुके यांनी पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शेतकºयांना रोखण्याच्या नावाखाली पोलिसांचा फौजफाटा शेतकºयांपेक्षा अधिक तैनात ठेवणे अन्यायकारक व पक्षपाती असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना शेतकºयांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध केला आणि लोकशाही हक्कांवर गदा आणणारे असे कोणतेही प्रयत्न सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला.