नोंदणीकृत धान उत्पादक शेतकरी खरिपाच्या बोनसपासून वंचित

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी तुमसर : भंडारा जिल्ह्यातील शास्- ाकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असलेल्या हजारो शेतकºयांना शासनाने जाहीर केलेला बोनस अजूनही मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाली आहे. हजारो शेतकरी अजूनही धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील शेतकºयांनी शासनाच्या आॅनलाइन पोर्टलवर नोंदणी केली असून, अनेकांनी प्रत्यक्षात आधारभूत केंद्रावर धानाची विक्रीदेखील केली आहे.

मात्र, केंद्रावर धान विक्री करणाºया काही शेतकºयांना बोनस मिळाले असून, उर्वरित २३०७ शेतकºयांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा करण्यात आली नाही. मागील खरीप पणन हंगाम सन २०२४-२५ वर्षा करीता केंद्र शासनाने मंजुर केलेल्या हमीभावा अतिरिक्त योजने अंतर्गत नोंदणीकृत शेतकºयांना (नोंदणीकृत शेतकºयांनी धान विक्री केली किंवा नसो) धान उत्पादन करीता त्याच्या धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रतिहेक्टरी २० हजार रुपये या प्रमाणात (दोन हेक्टरच्या मर्यादित) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली होती. परंतु नोंदणीकृत २३०७ शेतकºयांचे बोनस पासून अद्यापही वंचित आहेत.

सदर शेतकºयांच्या तगादा पणन कार्यालयास सतत सुरु असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने भीम कंपनी यांना बोनस पेमेंट सेटलमेंट पर्याय करण्याबाबत अवगत करावे. जेणेकरून प्रलंबित बोनस चुकाºयापासून एकही शेतकरी वंचित राहता कामा नये. यासंदर्भात राज्य शासन खरेदी प्रधान विभागाचे सरव्यवस्थापक देविदास भोकरे यांना शेतकºयांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, शेषराव कावळे, सुरचंद राऊत, आसाराम दमाहे, बाळकृष्ण राऊत, मोतीलाल दमाहे, रामकृष्ण लिल्हारे, ज्ञानेश्वर दमाहे, अनिल बिरणवार, रतीराम दमाहे यासह बोनस पासून वंचित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *