भरतीचे आदेश मात्र; अंमलबजावणीचा पत्ता नाही !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : साकोली तालुक्यातील शंकरपुर/वडे. येथील अंगणवाडी केंद्रात, अंगणवाडी मदतनीस पदभरती प्रकरणी आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला दिर्घ काळ लोटला असला तरीही अंगणवाडी मदतनीस पदभरतीची, साकोली बालविकास प्रकल्प अंतर्गत अजूनही अंमलबजावणी न झाल्याने, संतप्त शंकरपुर ग्रामस्थांच्या वतीने १३ जाने. मंगळवार रोजी स्वाक्षरानीशी त्वरित पदभरती राबवून अंमलबजावणी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.

गेल्या वर्षी, स्थानिक उमेदवाराच्या मुद्द्यावरून, वडेगांव येथील उमेदवार वर्षा लांजेवार यांच्या विरोधात चांगलेच आंदोलन चिघळले होते. परिणामी सदर उमेदवार अपात्र ठरून गावकºयांच्या लढ्याला यश मिळाले होते व स्थानिक उमेदवाराच्या अटीचा मुद्दा मार्गी लागला होता. पश्चात नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व भंडारा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी नव्याने भरती प्रक्रियाराबविण्याचे आदेश देखील साकोली बालविकास प्रकल्पाला दिले होते. मात्र; आयुक्तांच्या आदेशाला थेट तीन तर मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या आदेशाला तब्बल पाच महिने लोटली तरी देखील अजूनही साकोली बालविकास प्रकल्प अंतर्गत अद्याप भरती प्रक्रियेची कुठलीही कार्यवाही न झाल्याने पुन: एकदा गावकरी तापले असून विविध चर्चांना उधाण फुटले आहे. तर याच पार्श्वभूमीवर शंकरपुर ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत साकोली बालविकास प्रकल्प येथील अधिकाºयांना निवेदन सोपवून भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *