
भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी पालांदूर : परिसरातील ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार लाखनी तालुक्याच्या इसापूर तलाठी साजा अंतर्गत मचारणा ग्रामपंचायत हद्दीत उजेडात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी संगणमत करून आपल्या मर्जीतील १० ते १५ लाभार्थ्यांना मचारना गावातील शास्- ाकीय गट क्रमांक ९६, ९७, ९८ ह्या कुरणकरिता म्हणजेच गुरे ढोरे चारण्याकरीता राखीव असलेल्या शासकीय गटावर परस्पर मंजुरी दिली असल्याची लेखी तक्रार मचारना या गावातील सामाजिक कार्यकर्ते गिरिधारी गौतम ठवकर यांनी विभागीय आयुक्त नागपूर परिक्षेत्र यांना दिली आहे.
अशा शासकीय जागेवरील बेकायदेशीर बांधकामांवर स्थानिक प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने गावामध्ये सर्रास घरकुले उभारल्या जात आहेत. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत.ह्या अनधिकृत बांधकामांना परवानगी देणाºया ग्राम पंचायत पदाधिकाºयांची सखोल चौकशी करून त्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी ठवकर यांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीद्वारे केलेली आहे व या तक्रारीच्या प्रतीलिपी निवासी जिल्हाधिकारी,भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा यांचेसह पंचायत समिती लाखनीचे खंड विकास अधिकारी यांना दिलेल्या आहेत. आता ह्या प्रकरणावर नागपूरचे विभागीय आयुक्तांकडून कशा प्रकारच्या कारवाईचे आदेश पारित केले जातात याकडे मचारणा गावासह परिसरातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.