शहरातील विकासकामांमध्ये अडथळा आणणाºयांवर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नगर परिषद भंडारा अंतर्गत मंजूर झालेली विकासकामे तात्काळ पूर्ण करण्यात यावीत तसेच विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणाºया संबंधित लोकप्रतिनिधींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक तथा शिवसेना गटनेते राजेश धुर्वे यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनानुसार, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नातून अंदाजे ७०० कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये शहरातील रस्ते, बगीचे, पर्यटनस्थळे तसेच भूमिगत गटार यांसारख्या कामांचा समावेश आहे. संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले असून काही ठिकाणी कामांना सुरुवातही झाली आहे.

मात्र, काही लोकप्रतिनिधींकडून कंत्राटदारांना धमकावणे, कामांमध्ये अडथळे निर्माण करणे तसेच मारहाणीचे प्रकार घडत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शहराच्या विकासात अडथळा आणणाºयांवर कठोर कारवाई करूनआहे. शहराच्या विकासात अडथळा आणणाºयांवर कठोर कारवाई करूनअशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील अनेक रस्ते खोदकामामुळे खराब झाल्याने वाहतूक कोंडी, अपघात तसेच धुळीमुळे श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी अनेक भागांमध्ये नागरिकांना अद्याप नळ कनेक्शन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तातडीने नळजोडणी देऊन दिवसातून दोन वेळा नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली. मान्सूनपूर्व नाल्या व गटारांची सफाई अद्याप सुरू न झाल्याने पावसाळ्यात पाणी घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण होत असून डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई मोहीम तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक नितीन धकाते, लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर,उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, उपजिल्हाप्रमुख विकास मदनकर, शहर प्रमुख रोशन काटेखाये,नरेंद्र बुरडे, शिवसेना भंडारा न.प.गटनेता राजेश धुर्वे, माजी न.प.उपाध्यक्ष दिनेश भुरे, विद्यार्थी सेना प्रमुख शिवेश कडव तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *