
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थ्यांना काळ्या रंगाचा निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा करण्यात येत असुन त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.करीता याप्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच जिल्हा भंडारातर्फे राज्याचे अन्न पुरवठा मंत्री यांना भंडारा जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा जिल्हयातील स्वस्त धान्य दुकानदारामार्फत गोरगरीब नागरीकांना धान्य वाटप केले जाते. परंतु अनेक स्वस्त धान्य दुकानात काळया रंगाचा निकृष्ट दर्जाचा तांदुळ वाटप केला जात आहे.
या विषयाची अधिक माहिती घेतली असता असे लक्षात आले की, स्वस्त धान्य दुकानातून मिळणारा तांदूळ काही दलाल, व्यापारी लाभार्थ्यांकडुनविकत घेतात आणि तोच विकलेला तांदूळ शासकीय अन्नधान्य गोदामात परत येतो. तोच तांदूळ पुन्हा लोकांपर्यंत जातो असा भ्रष्टाचार व भेसळ भंडारा जिल्हयात अनेक महिन्यापासून सुरु असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व प्रकार भंडारा जिल्हयातील अन्न व नागरी पुरवठा अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे.
करीता सदर प्रकरणी तत्काळ चौकशी करुन स्वस्त धान्य दुकानांमधुन नागरीकांना निकृष्ट दर्जाचा काळा तांदळाचे वाटप करून त्यांच्या आरोग्याशी खेळणे बंद करावे तसेच बेकायदेशीर तांदळाची खरेदी करणाºया दलाल व व्यापाºयांवर कार्यवाही करावी , भंडारा येथील अन्न व नागरी पुरवठा अधिकारी यांची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे.अशी अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाची मागणी आहे. निवेदन देतांना विदर्भ अध्यक्ष सुरज दिलबहादुर परदेशी,राहुल थोटे,विजय बनकर,राजेंद्र ठाकरे,मुन्ना लाल मतानी,राजकुमार देहकर,अमन तांडेकर,लक्ष्मीकांत दांडेकर,दिपक वाघमारे,नितीन हटवार,राहुल नागदेवे,संदिप ढोमणे,आशिक शेंडे आदि उपस्थित होते.