अधिकारी असल्याचे सांगुन २० लाखांनी गंडविले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : फोनवर स्वत:ला मोबाईल कंपनीचा मोठा अधिकारी असल्याचे सांगुन शिवाजी नगर तुमसर येथील हरिशंकर रामलगन चौबे वय ७४ वर्षे यांची २० लाख ६१ हजार ३२० रूपयांनी आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून तुमसर पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला.याप्रकरणी पोलीसांनी मध्य प्रदेशातुन एका आरोपी युवकाला अटक करीत त्याच्या ताब्यातुन ३ लाख ३० हजार रूपये हस्तगत केले आहे.पुढील तपास सुरू आहे. शिवाजी नगर तुमसर येथील हरिशंकर रामलगन चौबे हे चिखला माईन्स इथुन फोरमन पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

फिर्यादीने तुमसर पोलीसात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक ९ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०२५ दरम्यान फिर्यादीच्या मोबाईल वर एका अनोळखी इसमाचा फोन आला व त्यांने मै अभिराज शुक्ला आय. डी. न. ५१७७३ टेलिकॉम रेग्युलेटरी आथोर्रेटी आॅफ इंडिया से बात कर रहा हूँ। अशी बतावनी करीत आप के नाम पर मुंबई से मोबाईल सिम कार्ड खरिदी है। आप इस नंबर से अश्लील फोटो भेजे है। तथा नरेश गोयल मनी लॉडरिंग केस में इन्वाल है। असे बोलुन फिर्यादीच्या खात्याची देवाणघेवाण बरोबर नसल्याचे सांगुन खात्याची पडताळणी करायची आहे असे बोलुन आरोपीने फिर्यादीच्या आयसीआयसीआय बँकेची सर्व माहिती मागवुन घेतली.

फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसल्याने आरोपीने त्यांना दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी विडियो कॉल करुन विडियो कॉल वर फिर्यादीला न्यायाधिश दाखविण्यात आले व त्यांनी त्याचे सर्व अकाऊंट चे वेरिफिकेशन करावे लागेल असे सांगुन बँकेतील ‘एफडी’ तोडुन आपणास ‘आरटीजीएस’ करावा लागेल असे सांगीतले. त्यानुसार हरिशंकर चौबे यांनी बँकेत जावुन मालविय नावाच्या अकांऊंट वर ७,५०,७२० रूपयांचा ‘आरटीजीएस’ केला नंतर मात्र आरोपीने फिर्यादीला तुम्ही पुर्ण ‘आरटीजीएस’ केला नाही असे बोलल्याने हरिशंकर चौबे त्यांनी पुन्हा गौरव नावाच्या अकाऊट वर दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी १३ लाख १० हजार ६०० रूपयांचा ‘आरटीजीएस’ केला असे एकुण २० लाख ६१ हजार ३२० रूपयांनी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच हरिशंकर रामलगन चौबे यांनी हा सगळा दिनांक १३ डिसेबर २०२५ रोजी त्यांचा मुलगा राजेश चौबे याला सांगीतला. त्यांनी लगेच तुमसर पोलीस स्टेशन गाठुन तक्रार नोंदविली असता तुमसर ठाणेदार यांनी तात्काळ पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करुन सायबर सेल च्या मदतीने सदर गुन्ह्याचा तपास करण्यास सुरूवात केली.

तपासादरम्यान मालविय नावाचा खाता हा मध्य प्रदेश येथील असल्याचे लक्षात येताच तुमसर पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी डी. बी. पथक चे प्रविण सयान व त्याच्या पथकाला मध्य प्रदेश येथे रवाना केले. पोउपनि प्रविण सयाम व त्याच्या पथकाने मध्यप्रदेशात जावुन आरोपीचा शोध सुरु केला असता सदर खाता क्र. हा. भानपुरा ता. भानपुरा जि. मनसौर म. प्र. येथील असल्याचे सिध्द झाल्याने पोलीसांनी भानपुरा येथे जावुन आरोपीला ताब्यात घेवुन त्याचे जवळुन ३ लाख ३० हजार रूपये जप्त केले. या प्रकरणात आरोपीचा सहमित्र रोहीत मेहर रा. भानपुरा हा उर्वरीत रक्कम घेवुन फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड करीत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *