
रवी धोतरे लाखनी :- येथील तालुका क्रीडा संकुलाजवळ असलेल्या मैदानावर युनिवर्सल व हायसिंथ इंग्लिश मिडीअम स्कूल या शाळेला तालुक्यात २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा कला गुणांचा कसा विकास झाला हे दाखविण्याकरिता येथील समर्थ मैदानावर या विद्यालयाने क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यासाठी भव्य मंडप व इतर सोई उपलब्ध करून दिल्या या उद्घाटनासाठी येथील तहसीलदार शीतल घावटे यांना प्राचारन करण्यात आले होते.
परंतु सुदैवाने त्यांचे आगामी होऊ घातलेल्या नागपूर महानगर पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याने त्या उपस्थित झाल्या नाहीत. कार्यक्रमाची रूपरेषा पूर्ण झाल्यानंतर अचानक मधमाश्यांच्या धुमाकूळ त्या मैदानावर झाला आणि विद्यार्थी सैरावैरा पळू लागले त्यात रोमित नावाच्या विद्याथ्यार्ला २५ ठिकाणी दंश झाल्याची चर्चा आहे.
यात काही शिक्षकावरही मधमाश्यांनी हल्ला चढविला त्यात मुख्याध्यापक व संचालक यांनी इतर विद्यार्थ्यांसह येथील क्रीडा संकुलात धाव घेत स्वत:ला कोडून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेने घाबरून एका विद्याथ्यार्ने अंगावरील कपडे काढून पळ काढल्याचीही माहिती आहे. यात संचालकांनी एका विद्यार्थ्याला स्वत: आपला जीव धोक्यात घालून क्रीडा संकुलात नेल्याने त्याचा जीव वाचला असला तरीही इतर विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. यासाठी येथील प्राचार्य सुधीर काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते. यामध्ये अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी जखमी झाले असून याची माहिती पोलीस विभागाला नसणे हे एक दुर्दैव आहे.