भंडारा,साकोलीत भाजप तर पवनीत राकॉं व तुमसरात अपक्षाची बाजी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील भंडारा , साकोली तुमसर व पवनी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज, २१ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर जाहीर झाला. यात भंडारा व साकोली नगर परिषदेमध्ये भाजपने विजय मिळविला असुन भंडाºयात भाजपच्या मथुरा मदनकर तर साकोलीत भाजपच्या देवश्री मनीष कापगते या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या. पवनी नगर परिषद अध्यक्षपदी राष्टÑवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाच्या डॉ. विजया नंदुरकर व तुमसर नगर परिषदेत राष्टÑवादी कॉंग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार सागर गभने यांनी विजय मिळविला. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्षांची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व निकालाची प्रतिक्षा आज, २१ डिसेंबर रोजी मतमोजनीनंतर संपली.

भंडारा नगराध्यक्षपदी भाजपच्या मधुरा मिलींद मदनकर यांनी दणदणीत विजय मिळविला. ३५ नगरसेवक संख्या असलेल्या भंडारा नगर परिषदेत भाजपचे २३ ,शिवसेना शिंदे ५,कॉंग्रेस ४,राष्टÑवादी कॉग्रेस अ.प.पक्षाचे ३ नगरसेवक निवडुन आले. साकोेली-सेंदुरवाफा नगर परिषदेत भाजपच्या देवश्री मनीष कापगते यांनी विजय मिळविला तिथे नगरपरिषदेच्या १० प्रभागांतून २० नगरसेवक निवडून आले असून त्यात भाजपाचे ८, काँग्रेसचे ७, राष्ट्रवादी काँग्रेसचा १, शिवसेनेचा १, तर ३अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. पवनी नगराध्यक्षपदी राष्टवादी कॉंग्रेस अ.प.पक्षाच्या डॉ.विजया नंदुरकर या विजयी झाल्या तिथे २० प्रभागांमध्ये भाजपचे १३, शिवसेनेचे ४, राष्ट्रवादी काँग्रेस अ.प. पक्षाचे दोन आणि अपक्ष एक असे नगरसेवक निवडून आले आहेत.तुमसर नगर परिषदेत राष्टÑवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार सागर गभणे यांचा निसटता विजय झाला येथे नगर सेवकांच्या एकूण २५ जागांपैकी भाजपा १०, राष्ट्रवादी (अ.प. गट) १०, काँग्रेस ३, शिवसेना (शिंदे गट) १ आणि अपक्ष १ नगर सेवकांनी विजय मिळविला. जिल्ह्यातील चारही नगर पालीकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *