
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: भंडारा सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचविणाºया जिल्ह्यातील चार नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज आले. हे निकाल आश्चर्यचकित करणारे आणि अनेकांना धक्का देणारे ठरले! भंडारा नगर परिषदेत विद्यमान आमदारांना धोबीपछाड देत मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी विराजमान केले.
जिल्ह्यातील १०० पैकी ५४ नगरसेवकांच्या जागा भाजपने जिंकत नंबर एक असल्याचे सिद्ध केले. भंडारा येथे भाजपाच्या मधुरा मिलिंद मदनकर विजयी झाल्या. मधुरा मदनकर यांनी काँग्रेसच्या यांचा ४ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला. भंडाºयात भाजपला ३५ पैकी २३ नगरसेवक निवडून आणण्यात यश आले. शिवसेनेला पाच, काँग्रेसला ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अ.प. ३ नगरसेवकांवर समाधान मानावे लागले.
भंडारा नगरपरिषद अध्यक्षाची निवडणूक शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. शिवसेनेकडून त्यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात होत्या. विजयाच्या पूर्ण खात्रीने निवडणूक लढविणाºया शिवसेनेला मात्र तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. मधुरा मदनकर यांना १८७२७ , जयश्री बोरकर यांना १४६७९ आणि अश्विनी भोंडेकर यांना १३,१०३ मते मिळाली.
या निकालामुळे आ. भोंडेकर यांना मोठा धक्का बसला. त्यांना नगरसेवकही निवडून आणण्यात यश आले नाही. या विजयामुळे निवडणुकीच्या काळात कायमच चर्चेत राहिलेल्या आ. भोंडेकर आणि भाजपाचे आ. परिणय फुके यांच्या संघर्षात फुकेंचा विजय झाल्याचे बोलल्या जात आहे. भंडाºयात आजच्या निकालाने अनेक दिग्गजांना पराभव दाखविला. यात राष्ट्रवादीचे सात वेळा नगरसेवक राहिलेले विनयमोहन पशीने, शिवसेनेचे बाबू बागडे, भाजपाचे जाकी रावलानी, बंटी बांगडकर, बंटी मिश्रा यांचा समावेश आहे.
आजच्या निवडणुकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने प्रभाग ११ मधून विजयी झाले आहेत. भंडाºयात आक्षेप : भंडाºयात मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक तीन मधील दोन उमेदवारांची मतेच दिसत नसल्याने शिवसेनेचे संजय कुंभलकर यांनी आक्षेप घेतला. यावेळी बॅलेट युनिट आणण्याची विनंती करण्यात आली. त्यातही सहा पैकी केवळ चारच उमेदवारांची नावे होती. त्यामुळे बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत रद्द करण्याची मागणी कुंभलकर यांनी केली आहे. अपेक्षांवर खरे उतरू : आ. फुके जनतेने भाजपावर विश्वास टाकीत नगराध्यक्ष पदासह २३ नगरसेवक निवडून दिले. बहुमताची सत्ता देणाºया भंडारेकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भंडाºया चा कायापालट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून जनतेच्या अपेक्षेवर खरे उतरण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया आ. परिणय फुके यांनी विजयानंतर दिली.