चांदूर रेल्वेतील मीरा इंडस्ट्रीजला आग चणाडाळ, कुटार व महागडी यंत्रसामग्री खाक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी चांदूर रेल्वे : शहरालगत असलेल्या कुºहा रोडवरील एमआयडीसी परिसरातील मीरा इंडस्ट्रीज या चणाडाळ प्रक्रिया करणाºया मोठ्या मिलमध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मोठ्या प्रमाणात चणाडाळ, चणा, कुटार तसेच मिलमधील महागडी यंत्रसामग्री जळून खाक झाली असून उद्योगाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मीरा इंडस्ट्रीजमध्ये दररोज सुमारे ७० टन चण्यावर प्रक्रिया करून चणाडाळ निर्मिती केली जाते.

जवळपास दोन ते अडीच एकर परिसरात पसरलेली ही इंडस्ट्री तीन मजली इमारतीत कार्यरत असून, त्यामुळे आगीचे स्वरूप अधिकच भीषण झाले. आगीचे प्राथमिक कारण शॉर्टसर्किट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी रात्री दहापर्यंत मिलमध्ये नियमित कामकाज सुरू होते. काम संपल्यानंतर मजूर व मालक घरी निघून गेले होते, मात्र काही मजूर मिल परिसरातील निवासस्थानी झोपले होते. थंडीचे दिवस आणि मध्यरात्र असल्यामुळे आग नेमकी केव्हा लागली याची कोणालाही चाहूल लागली नाही. मंगळवारी सकाळी मिलमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच मालक पियुष गंगन व सचिन गंगन यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली. तात्काळ मिलचे शटर उघडताच आत अग्नीचे रौद्र रूप पाहायला मिळाले आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *