न.प.तिरोडाने विनापरवानगी झाडे कापणाºया वीज वितरण कंपनीस बजावली नोटीस

भंडारा पत्रिका/रमाकांत खोब्रागडे तिरोडा : संत सज्जन वार्ड तिरोडा येथील छत्रपती दुबे शाळेचे प्रांगणातील तसेच रस्त्यावरील सहा झाडे वीज वितरण कंपनीतर्फे विनापरवानगी कापण्यात आल्याने नगरपरिषद तिरोडा तर्फे वीज वितरण कंपनीस कार्यवाही पुर्व नोटीस बजावण्यात आली असून समाधानकारक खुलासा नसल्यास कारवाई करण्याची ही नोटीस मध्ये म्हटले आहे .

पर्यावरणाचे होणारे नुकसान कमी व्हावे म्हणून शासनातर्फे कोट्यावधी रुपये खर्च करून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची मोहीम त्याचप्रमाणे सामाजिक, खाजगी वा नागरिकही मोठ्या प्रमाणात आपापल्या परीने वृक्ष लागवड करून संगोपन करीत असले तरी १० डिसेंबर रोजी दुपारी ११ वाजताचे दरम्यान वीज वितरण कंपनी तिरोडाचे कर्मचाºयांनी नगरपरिषदेची कुठलीही परवानगी न घेता किंवा सूचना न देता संत सज्जन वार्ड तिरोडातील छत्रपती दुबे शाळेचे प्रांगणातील तसेच रस्त्यावरील २ पाल्म, २ सपतपर्णि, २ गुलमोहर अशी ६ झाडे कापल्याने तसेच आणखी काही झाडे कापण्याची शक्यता असल्याने येथील नागरिकांनी माजी नगरसेवक राजेश गुनेरीया यांना माहिती दिल्यावरून राजेश गुनेरिया यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन वीज वितरण कंपनीचे कर्मचाºयांना आपण विनाकारण झाडे कापू नका असे सांगितल्यावरुन आणखी काही झाडाची होणारी कत्तल थांबली.

यावरून तिरोडा नगर परिषदेतर्फे १९ डिसेंबर रोजी सहायक अभियंता वीज वितरण कंपनी तिरोडा यांना नोटीस बजावण्यात येऊन आपण विनापरवानगी ६ झाडे कापले असल्याने महाराष्ट्र शासन शहरी क्षेत्र वृक्ष संवर्धन कायदा १९७५ तसेच संबंधित पर्यावरण नियमांनुसार परवानगीशिवाय झाडे कापल्याने हा दंडनीय गुन्हा असून त्या अन्वये आपणास निर्देशित करण्यात येते की, आपण विनापरवानगी झाडतोड का केली? याबाबत लेखी खुलासा ७ दिवसाचे आत करावा तसेच आपला खुलासा समाधानकारक नसल्यास दंड वसुली किंवा आवश्यक असल्यास नुकसान भरपाई तसेच बदली रोपांची संख्या लावण्यासाठी आदेशही दिल्या जातील. तसेच ही नोटीस आपणास कारवाई पूर्व देण्यात येत असून या नोटीसची आपण दखल घ्यावी असेही सूचित करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *