
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील रहिवासी तथा वरिष्ठ पत्रकार व महसूल सेवक अनिल चंद्रशेखर वैद्य (५४) यांचे २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता अल्पशा आजाराने नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर जांभोरा येथील स्मशानभूमीत सायंकाळ दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली, ३ बहिणी, जावई व बराच मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते दै. भंडारा पत्रिकाचे वार्ताहर आशा वैद्य यांचे पती होत.