
जवाहरनगर : प्रदीप चोखाजी रामटेके (५६), मु.गोंडवाना नगर देवरी, जिल्हा गोंदिया ह.मु.विवेकानंद कॉलनी, ठाणा ता. भंडारा यांचे पहाटे ६ वाजता वाजताच्या सुमारास निधन झाले. ते मूळचे मोखारा ता.पवनी, जिल्हा भंडारा येथील मूळ रहिवासी असून देवरी येथील मनोहर भाई पटेल महाविद्यालय येथे प्राध्यापक व त्यानंतर २०२४ ला कोंढी येथील ग्रामविकास कनिष्ठ हायस्कूलचे प्राचार्य होते. त्यांचेवर देवरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा आप्त परिवार आहे. ते आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते व भारतीय संविधान चे गाढे अभ्यासक, उच्चतम कोटी चे लेखक व प्रखर प्रवक्ता, म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.