
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरातील देशबंधू वॉर्डातील रहिवासी प्रशांत (मोनू ) मधुकर डोमळे यांचे दि. १५ डिसेंबर रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते ३७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई वडील, बहिणी, जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. शहरातील प्रसिद्ध दस्तलेखक मधुकर डोमळे यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पार्थिवावर १६ डिसेंबर रोजी वैनगंगा नदी स्मशान घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.