
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील एका घरात १४ गोवंशीय जनावरांना निर्भयतेने बांधून ठेवण्याची व गोमास मिळाल्याचे घटनेवरून संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात संतापाची लाट पसरली असून या घटने विरोधात आज दिनांक १७ रोजी तिरोडा बंदचे शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र या बंदला स्थगिती देण्यात आली आहे. हिंदू संघटनांद्वारे निषेध नोंदविण्याकरिता आज दिनांक १७ रोजी सकाळी १० वाजता स्टेशन मार्ग तिरोडा वरील गजानन महाराज मंदिरासमोर सकाळी दहा वाजता सार्वजनिक हनुमान चालीसा वाचन करून येथून मुख्याधिकारी नगर परिषद तिरोडा यांना निवेदन देण्यात येणार आहे. निवेदन देण्याकरीता मोर्चाने जाणार असल्याची माहिती सकल हिंदू समाज तिरोडा, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तिरोडा आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद व शिवनीती सामाजिक संघटनेतर्फे देण्यात आली असून आयोजित या हनुमान चालीसा व मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.