चांदोरी खुर्द येथे नियोजित बालविवाह रोखला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह विरोधात अनेक कडक कायदे असूनही बालविवाह होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार तिरोडा तालुक्यातील चांदोरी खुर्द येथे १४ डिसेंबर रोजी समोर आला. दरम्यान दामिनी पथक, जिल्हा महिला बाल विकास विभाग, इंडियन वेलफेअर सोसायटी व तिरोडा पोलिसांनी वेळीच कारवाई करीत नवरदेव लग्न मंडपात जाण्यापूर्वीच नियोजित बालविवाह थांबविला. चांदोरी खूर्द येथे १४ डिसेंबर रोजी बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली.

माहिती मिळताच, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथक, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, इंडियन सोशल वेलफेअर व तिरोडा पोलिसांचे एक पथक तयार करून नियोजित वरवधुंचे जन्म प्रमाणपत्र स्थानिक ग्रामसेवकाकडून मागविण्यात आले. प्रमाणपत्राची पाहणी केली असता वराचे वय २१ वषार्पेक्षा कमी असल्याचे आढळले. इकडे, विवाहस्थळी विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. डीजे, नाचगाणे, जमलेली वºहाडी, जेवनाची तयारी सर्व तयार होते.

दरम्यान, प्रशासनाचे पथक चांदोरी खूर्द येथे पोहचले व नियोजित बालविवाह थांबविला. यावेळी पथकातील अधिकाºयांनी वरवधुंच्या आईवडील व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक २००६ कायद्याची माहिती देऊन बालविवाहामुळे होणाºया दुष्परिणामाबद्दल जनजागृती केली. तसेच लग्नाचे वय पूर्ण होण्यापूर्वी बालकाचे लग्न करणार नसल्याचे हमीपत्र वराच्या आईवडील, नातेवाईकांकडून लिहून घेण्यात आले. तसेच जमलेल्या वºहाडी मंडळीची बालविवाह प्रतिबंध शपथ घेण्यात आली. ही कारवाई जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांच्या नेतृत्वात दामिनी पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मनीषा निकम, मुकेश पटले, ज्ञानेश्वर पटले, भागवत सूर्यवंशी, रूपेश चुंडुके, धमेंद्र भेलावे, आशिष पुंडे, पुजा डोंगरे, अमित बेलेकर, पुर्नाप्रकाश कुथेकर, दीपमाला भालेराव, अमोल पानतावणे, प्रशांत बंसोड, वैशाली भांडडकर, सुवर्णा मडावी, सोनाली टिके व तिरोडा पोलिसांनी केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *