इंडिगो व स्टारएयरची गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुन प्रवासी सेवा बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून थेट हैदराबादसाठी गोंदिया-हैदराबाद सुरु झालेली विमान सेवा अखेर २ वर्ष चार महिन्यानंतर बंद करण्यात आल्याने प्रवाशामध्ये संतापाची लाट आहे. त्यातच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विकासात्मक गोष्टींचा फोलपणा उघड झाला आहे. इंडिगो विमान कंंपनीने गोंदिया विमानतळावरुन पुर्णत:१ मे २०२६ पासून प्रवाशी तिकीट बुकिंग बंद केले आहे. १ डिसेंबर २०२३ रोजी इंडिगो कंपनीद्वारे अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली विमानसेवा ३० एप्रिल २०२६ पर्यंत नियमित सुरु होती. मात्र यातच नियमित असलेली गोंदिया हैद्राबाद-गोंंदिया विमानसेवेला मात्र ब्रेक लागला आहे.

दरम्यान बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक गिरीशचंद्र वर्मा यांना विचारणा केले असता विमानतळ प्राधिकरणाकडे इंडिगो व स्टार एयर या दोन्ही विमानकंपन्यांनी विमानसेवा सुरु ठेवण्यासंदर्भात काहीही निरोप दिला नसून आजच्या घडीला गोंदिया विमानतळावरुन एकही प्रवासी विमान सेवा सुर नसल्याची पुष्टी केली. तर गोंदियाइंदुर ही स्टार एयरची सेवा १६ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झालेली असून गोंदिया ते इंदूर मार्गावर सुरू आहे. स्टार एयरने ही सेवा १५ जानेवारी २०२६ पासून ही सेवा मुंबई व बंगळूर शहराशी जोडली आहे. ही विमानसेवा आठवड्यातून काही विशिष्ट दिवशी (मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार) उपलब्ध होती, ही सेवा पण बंद झालेली आहे.

फ्लायबिग कंपनीने गोंदिया ते हैदराबाद आणि इंदूरची विमानसेवा सुरू केली होती. मात्र, फ्लायबिग एअरलाइन्सने सुरू केलेली ही विमानसेवा २१ आॅगस्ट २०२३ पासून बंद झाली. त्यानंतर इंडिगो कंपनीने गोंदियाच्या विमानतळावरुन विमानसेवा सुरु केली असून आजपर्यंत हजारो प्रवाश्यांनी या विमानतळावरुन प्रवास केला आहे. विमानतळावर नाईट लँडीगची सोय विमानांच्या उतरणी आणि उड्डाणासाठी विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (कछर) बसवण्यात आले आहे. यामुळे विमाने दिवसाआणि रात्री दोन्ही वेळी विमानतळावर उतरू शकतील अशी सुविधा गोंदियाच्या बिरसी विमानतळावर उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे ही प्रणाली बसविल्यानंतरच गोंदिया इंदुर हि विमानसेवा सायकांळच्यावेळेस सुरु झाली होती.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *