
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया शहरातील सायकलिंग संडे ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे, पाण्या अभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये या उद्देशाने सायकलिंग संडे ने शहरातील विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी शेकडो पाणवठे लावण्यात धैर्य ठेवला आहे. तर याची सुरुवात आज गोंदिया शहरातील सुभाष गार्डन या ठिकाणी गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते पाणवठे लावण्यात सुरवात करण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील तापमान हा ४५ च्या वर जातो त्याच प्रमाणे उन्हाळ्यात नदी नाले व लहान तळ्यातील पाणी खालावत जाते. अशा वेळेस नागरिकांनी पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते.
सध्या चा तापमान ४० च्या वर पोहोचा आले, जिल्ह्यात पाण्याचा ठणठणाट होऊ लागला अश्यातच पक्ष्यांसाठी गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शहराच्या विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी ५०० च्या वर मातीचे पाणवठे तयार करून लावण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पाणवठ्या मुळे पक्ष्यांना मोठा आधार मिळणार आहे. जिल्ह्यातील जलाशय कमी होऊ लागले आहे. त्यामुळे जलाशयाचा नैसर्गिक जलसाठा भर उन्हाळ्यात कमी होत असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी माणसांबरोबर पक्षयांना भटकंती करावी लागते. उन्हाळा सुरु होताच सामाजिक संस्थांकडून विविध ठिकाणी पाणपोई सुरु करण्यात आल्या. मात्र या मुळे माणसांना पाण्याची सोय होत असते. मात्र पक्ष्यांना पाण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागत असते. पाण्या अभावी पक्ष्याचे मृत्यू होऊ नये यासाठी सायकल संडे ग्रुपने पाणवठे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे.