नवेगावबांध जवळ भीषण अपघात, बहिण-भाऊ जागीच ठार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे झालेल्या भीषण अपघातात देवरी शहरातील बहीण भाऊ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. ११) सायं. अंदाजे ६:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. अंकुर अरुण शहारे (वय-१८ रा. देवरी) आणि रितिका संजय जांभुळकर (वय१०, रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी) असे मृत दांपत्याचे नाव आहे. तर अरुणा अरुण शहारे (वय ५० रा. देवरी) असे जखमी आईचे नाव आहे. जखमीला तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे. अजुर्नी मोरगाव तालुक्यातील ग्राम बोळदे येथे त्यांचे नातलगाचे लग्न सभारंभाचे कार्यक्रम असल्या कारणामुळे ते आपल्या तिघेही दुचाकीवरून देवरी वरून बोळदे येथे जात होते.

सायंकाळी ६:३० च्या सुमारास अर्जुनी/मोर तालुक्यातील नवेगाव/बांध येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागेहून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरून खाली पडले. आणि या भीषण अपघातात अंकुर तसेच त्याची बहीण रितिका यांच्या शरीरावरून वाहन गेल्याने त्यांच्या अक्षरश: चेंदामेंदा झाला. तर आई अरुणा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन एकच गर्दी केली होती. अचानक या घडलेल्या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे शहारे कुटुंब वास्तव्याला होते. आणि रितिका ही त्यांच्याच कुटुंबात राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती.वडील कोरोना काळामध्ये वारल्यामुळे घरची जबाबदारी ही आई अरुणा हिच्या अंगावर होती.

भविष्याचा आधार हरपला…

मिळालेली माहितीनुसार अरुणा ह्या मुलगा अंकुर यांचेसह देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे वास्तव्याला असून त्यांची भाची रितिका ही त्यांच्या सोबतच राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे, कोरोना काळात त्यांचे पती अरुण शहारे यांचे निधन झाले होते. ३ त्यामुळे घराची जबाबदारी ही अरुणा यांच्यावर असताना मुलगा अंकुर हा त्यांच्या भविष्याचा आधार होता. मात्र त्याचाही अपघाती मृत्यू झाल्याने अरुणा ह्या एकाकी पडल्या आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *