महाप्रज्ञा बौद्ध विहार तिरोडा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा येथील महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे वतीने भीमा कोरेगाव २०८ वा शौर्य दिवसा नीमीत् कार्यक्रमात न.प.तिरोडाचे नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पंचशील ध्वजारोहण करून सर्व उपस्थित अतिथीं च्या हस्ते भीमा कोरेगाव च्या युद्धात सन १८१८ मध्ये इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या युद्धात ५०० महार सूर वीरांनी २८ हजार पेशव्यांना कापून मोठा विजय मिळवला होता. असा इतिहास आहे. या युद्धातील प्रमुख योद्धा सरदार सिद्धनाक महार यांच्या पूर्णा कृती तैल चित्राला माल्यार्पण करून तसेच भीमा कोरेगाव शौर्य स्तंभाला पुष्प अर्पण करून उपस्थित सर्व अतिथी, बौद्ध उपासक, उपासिका यांच्यातर्फे मानवंदना देण्यात आली व अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी तिरोडा नगर परिषद चे नवनियुक्त नगराध्यक्ष अशोक असाटी यांच्या हस्ते विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णा कृती प्रतिमेला माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात येऊन नवनियुक्त नगर सेवक विजय बन्सोड, डॉ. कुमुद संदीप मेश्राम, सौ. मंगला नितीन तिरपुडे, महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र बडगे, सचिव प्रवीण चव्हाण, सहसचिव महेंद्र वालदे, कोषाध्यक्ष संजय जांभुळकर, संघटक पवन वासनिक, मार्गदर्शक सुरेश बन्सोड, रमेश नांदगाये, कार्यकारणी सदस्य पवन वाघमारे, राहुल बडगे, लंकेश टेंभेकर, प्रवीण नंदागवळी तसेच समता सैनिक दलाचे कमांडर राजहंस चवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाप्रज्ञा बुद्ध विहार येथे सर्व बौद्ध उपासक, उपासिका व उपस्थित मान्यवर यांच्या तर्फे तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. व समीती तर्फे नगराध्यक्ष अशोक असाटी नगरसेवक विजय बनसोड डॉक्टर सौ कुमुद संदीप मेश्राम सौ मंगला नितीन तिरपुडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विहार समितीचे उपाध्यक्ष महेंद्र बडगे यांनी केले .

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *