लाखेगाव येथे भगवत ज्ञान सप्ताहाची महाप्रसादाने सांगता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील लाखेगाव येथे २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेले श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे समापन १ जानेवारी २६ रोजी होऊन या सप्ताहात कथा वाचक कुणाल जी मिश्रा यांना लाखेगाव वासीयांनी भक्ती भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. वृंदावन धाम लोहार मोहल्ला चौक लाखेगाव येथे २५ डिसेंबर २५ ते १ जानेवारी २६ पर्यंत श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला होता या सप्ताहात भागवत कथा वाचक कुणाल जी मिश्रा यांनी कथा वाचन केले तसेच या सप्ताहाची पूर्णाहचती एक जानेवारी २६ रोजी हवन पूजन दह- ीकाला व सामूहिक भोजन करून करण्यात येऊन कथा वाचक कुणाल जी मिश्रा यांना लाखेगाव वासी यांनी टाळ मृदुंगाचे गजरात लाखेगाव सीमे पर्यंत पोहचते करून भक्ती भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *