
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : घोगराकडून पांजराकडे येत असलेले दहा चाकी टिप्परचे वायरिंग मध्ये बिघाड येऊन आग लागल्याने चालक सुखरूप बचावला असला तरी टिप्परचे केबिन जळाल्याने अंदाजे पाच लक्ष रुपयाचे नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ७ जून रोजी रात्री १२ वाजता चे दरम्यान घोगराकडून मुंडीकोटा मार्गे पांजराकडे येत असलेला १० चाकी टिपर क्रमांक एम एच ३६ एफ २९ ३९ हा मुंडीकोटा बाजार चौकात आला असता पेपरचे वायरिंग मध्ये स्पार्किंग होऊन आग लागल्याचे लक्षात येताच टिप्पर चालक सुधीर गोमासे मांजर यांनी टिप्पर उभा करून खाली उतरला. परिसरातील नागरिकांनां टिप्पर जळत असल्याचे दिसताच मोठ्या पंपाने पाणी मारून आग विझविल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही. मात्र या आगीत टिप्परचे अंदाजे पाच लक्ष रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची नोंद तिरोडा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली आहे.