
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील चिखली येथील रहि- वासी स्वगावी चिखली येथे मोटार सायकलने जात असता सदर मोटार सायकल घसल्याने चालकाचा मृत्यू झाला. तिरोडा पोलीस सुत्रानकडून मिळालेले माहितीनुसार १४ तारखेचे रात्री ९ वाजता दरम्यान तिरोडा येथून अभिमन्यू महादेव पारधी (५६) आपले मोटार सायकल क्र. एम एच ३५ टी १७९३ ने तिरोडा येथून चिखलीकडे जात असता गराडा शिवारातील हलगी टोला जवळ रस्त्याच्या कडेवरून त्यांची मोटार सायकल घसरून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दुसºया दिवशी १५ तारखेचे सकाळी ७ वाजता दरम्यान या रस्त्यावरुन ये जा करणाºयांना एक व्यक्ती मोटारसायकलसह पडून असल्याचे दिसल्यावरुन तिरोडा पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक विजय मसराम शिपाई शैलेश दमाहे यांनी घटनास्थळी जाऊन प्रेताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून मृतकाचा मुलगा लिकेश अभिमन्यू पारधी याचे तक्रारी वरून भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक शुभम नाष्टे करीत आहे.